बंद

जिल्हा विकास आराखडा

          भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत – भारत२०४७” करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यामध्ये सन २०२५-२६ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. सन २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे सुन्दा साध्य करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. विकसित भारताची ही उदिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्याना सुध्दा सन २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर, सन २०३७ पर्यंत २.५ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. यासाठी विकासाचे केंद्र माणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टीकोन विकसित करणे शक्य होईल व असा विकास सर्वसमावेशक असेल आणि शाश्वत विकास उहिष्टे साध्य करण्यात मदतही करेल. विविध जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबी विचारात घेऊन जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

          जिल्हा विकास आराखडा तयार करणे व त्याला गुणात्मक सहाय्य देण्यासाठी जिल्हास्तरावर खालील समिती स्थापन करण्यात आली आहे

 

अ.क्र. सदस्य पद
जिल्हाधिकारी, जळगाव अध्यक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव सदस्य
आयुक्त,जळगाव शहर म.न.पा.,जळगाव सदस्य
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव सदस्य
जिल्हा उद्योग अधिकारी,जळगाव सदस्य
जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जळगाव सदस्य
निवासी जिल्हाधिकारी, जळगाव सदस्य
विविध विभागाचे जिल्हा प्रमुख, जळगाव सदस्य
प्रमुख भागधारकाचे प्रतिनिधी,जळगाव सदस्य
१० जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव सदस्य सचिव

जिल्हा विकास आराखडामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपल्या काही कल्पना सुचविण्यासाठी.येथे क्लिक करा
संपर्क
जिल्हा नियोजन अधिकारी
जिल्हा नियोजन समिती कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव
०२५७-२२२३१३५
व्हाट्सअप :