• सामाजिक दुवे
  • साइटमॅप
  • प्रवेशयोग्यता दुवे
बंद

तहसील कार्यालय जळगाव

🔷 जळगाव तालुका – औद्योगिक व नागरी विकासाचे केंद्रबिंदू! 🔷

जिल्हा मुख्यालय असलेल्या जळगाव तालुक्यातून नागपूर–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 प्रवास करत जातो, ज्यामुळे या भागाचा औद्योगिक विकास वेगाने वाढत आहे.
📈 लोकसंख्येचा झपाट्याने वाढणारा दर – त्यामुळे नागरी व ग्रामीण रहिवासी क्षेत्रांचा विस्तारही दिवसेंदिवस होत आहे.

🏛️ प्रशासकीय, न्यायिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून जळगाव तालुका अत्यंत महत्वाचा ठरत असून,
📍 जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण म्हणून याचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे.

➤ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा,
➤ औद्योगिकीकरणाच्या संधी उभारणारा,
➤ आणि नागरी विकासास चालना देणारा – जळगाव तालुका

1) जळगांव तालुक्याची वस्तुस्थिती :-

तपशिल जळगांव तालुक्याच्या सन 2011 च्या जनगणनेनुसार जळगांव तालुक्याची लोकसंख्या खालीलप्रमाणे
लोकसंख्या जळगांव महानगरपालिका हददीतील (शहर) ग्रामीण एकुण एकंदर लोकसंख्या
एकूण 460228 213995 674223

वरील लोकसंख्या अदमासे 10% वाढ झालेली असल्यास सदरची लोकसंख्या 7.50 लाख असण्याची शक्यता आहे.

2) जळगांव तालुक्याचे कार्यक्षेत्रातील महसूली गांवे / सजे याबाबत तपशिल:-

तपशिल एकुण्‍ महसूली गांवे महसूल मंडळ महसूल सजे
जळगांव शहर 4 02 9
जळगावं ग्रामीण 88 06 37
एकूण 92 08 46

वरील मंडळाच्या संख्येत 01 मंडळाचा काही भाग हा शहरात येत असल्याने संख्या-02 दर्शविली आहे.तसेच मा.महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 16 ऑक्टोबर 2017 रोजीच्या प्रसिद्ध अधिसुचनेनुसार  अनुसूची-अ मध्ये जळगांव तालुक्यात एकूण 46 सजेची संख्या दर्शविण्यात आलेली असून त्यापैकी 09 सजे जळगांव शहर व 37 सजे जळगांव ग्रामीण मध्ये समाविष्ट आहेत.

3) पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्र

पोलिस स्टेशन 04(शहरी) 01(ग्रामीण) 02(शहरी+ग्रामीण) एकुण 07 पोलिस स्टेशन

वरीलप्रमाणे पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्र अंतर्भूत असून त्यानुसार ओळखपरेड,मृत्युपुर्व जबाब इत्यादी दंडाधिकारीय कामकाज पहावे लागते, शासन विरोधात उच्च व सर्वाच्च न्यायालयात खटले चालतात.

4) नागरी सुविधातून (महा ई-सेवा केंद्र) वितरीत होणारे विविध प्रकारचे दाखले :-

विविध प्रकारचे दाखले

 (जात,रहिवास,राष्ट्रीयत्व,उत्पन्न)

साधारणत: 1 April 2024 to 23 Jan 2025 संख्या – 123103
दैनंदिन कार्यालयीन कामकाजा संदर्भातील अर्ज 28415
7/12,फेरफार,इत्यादिंच्या नकला मिळणेकामी अर्ज 10245
शिधापत्रिका 3215
माहिती अधिकार 415 (वर्षभरात)

वरीलप्रमाणे नागरी सुविधा केंद्रातून (महा ई-सेवा केंद्र) वितरीत होणारे विविध प्रकारचे दाखले हे जळगांव तहसिल कार्यालयामार्फत दिले जातात. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती, पुरवठा विषयक कामकाज, जमीन मागणी संबंधीचे विविध व्यक्ती व संस्थाची प्रकरणे, नियोजन व कार्यवाही बाबतच्या बैठका, जळगांव शहर विधानसभा मतदार संघ तसेच जळगांव ग्रामीण मतदार संघाचे निवडणुक विषयक एकत्रित कामकाज,जनगणना व शासनाने वेळोवेळी नेमून दिलेली विविध कामे याचीही व्याप्ती फार मोठी आहे.

5) अर्ध न्यायिक अपील प्रकरणांचा तपशिल:-

अपील प्रकरणे प्राप्त अर्ज संख्या
आर.टी.एस 102
वहिवाट 24
टेनन्सी 07
एकुण 133

6) कायदा व सुव्यवस्था :-

  1. शेतकरी आत्महत्या – माहे 1 April 2024 to 31 Jan 2025 या कालावधीत जळगांव तालुक्यात 07 शेतकरी आत्म्हत्या झाल्या असून शासनाचे निकषानुसार सदर प्रकरणे पात्र असल्याने संबंधीत शेतकऱ्यांना मदत पुरविणेकामी प्रकीया पूर्ण करण्यांत आली असून मा. जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यांत आले आहे.

2.वर्षभरात चॅप्टर केसेस – कलम 126 प्रमाणे 1254 प्रकरणे, कलम 128 प्रमाणे 139 प्रकरणे,

कलम 129 प्रमाणे   468 प्रकरणे

  1. वारस दाखले (वार्षिक) – 124
  2. ऐपतीचे दाखले (वार्षिक) – 97

7) तालुक्यातील राजकीय स्थिती :-

तालुक्यातील महसूली गांवे तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या जळगांव शहर विधानसभा मतदार संघ जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघ लोकसभा मतदार संघ
मतदान केंद्र मतदार संख्या मतदान केंद्र मतदार संख्या मतदान केंद्र मतदार संख्या

 

92 69 358 433467 196 340303 358 339130

 

तालुक्यात विधानसभा मतदार संघ संख्या तालुक्यात लोकसभा मतदार संघ संख्या तालुक्यात जिल्हा परिषद गट संख्या तालुक्यात पंचायत समिती गण संख्या तालुक्यातील महसूली गावांची संख्या तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या जळगांव शहरातील महानगरपालिका संख्या जळगांव तालुक्यातील नगरपरिषद संख्या
02 01 05 10 92 69 1 1

 

8) तालुक्यातून वैधरित्या निवडून आलेल्या संख्या:-

जळगांव महानगरपालिका असून नगरसेवक 75
पंचायत समिती सदस्य 10
जिल्हा परिषद सदस्य 05
खासदार 01
आमदार (जळगांव शहर 13 तसेच जळगांव ग्रामीण 14) 1+1=2

जळगांव जिल्हयाचे मुख्यालय जळगांव असून वेळोवेळी जिल्हयात येणारे मा.राष्ट्रपती,मा. पंतप्रधान, मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. पालकमंत्री किंवा तत्सम उच्च पदस्थ्‍ पदाधिकारी तसेच सचिव दर्जाचे अधिकारी यांचे दौऱ्यात राजशिष्टाचाराचा भाग म्हणुन जिल्हाधिकारी जळगांव तसेच उपविभागीय अधिकारी, जळगांव भाग यांचे बरोबर तहसिलदार, जळगांव यांनाही उप‍स्थित रहावे लागते. त्यामुळे साधारणत: कार्यालयीन कामकाजाच्या वेळेच्या 30 ते 35 टक्के वेळ हा राजशिष्टाचार संबंधीत कामकाजांत व्यतीत होतो.

 

 

 

9) तालुक्यातून होणारी महसूल वसुली :-

महसूली वसुलीबाबत सन 2023-24 अखेर उदिष्टे व साध्य   (आकडे लाखात)

वसूली बाब तपशिल इष्टांक वसूली टक्केवारी
जमीन महसूलाची वसुली 1670.00 1701.57 101.89%
गौणखनिज, करमणुक कर व आर.आर.सी. ची वसूली 890.00 909.85 102.23%
संजय गांधी योजना कर्जाची वसूली 0 0
एकुण एकंदर 2560.00 2611.42 102.00%

 

10) संजय गांधी निराधार अनुदान योजना:-

लाभार्थ्याची संख्या शहरी ग्रामीण वाटप केलेले अनुदान
शहरी ग्रामीण
8961 4083 4878 23461700 32125000

 

11) इंदिरा गांधी योजना :-

लाभार्थ्याची संख्या शहरी ग्रामीण वाटप केलेले अनुदान
शहरी ग्रामीण
15756 1785 13971 3440800 15148200

 

12) श्रावणबाळ सेवा योजना:-

लाभार्थ्याची संख्या शहरी ग्रामीण वाटप केलेले अनुदान
शहरी ग्रामीण
15315 2999 12316 16185000 84824000

 

13) रोजगार हमी येाजना सन 2024-25 ची माहिती :-  

एकुण कामांची संख्या मजूर उपस्थिती
206 कामे 7000

 

 

 

14 ) पुरवठा विभाग स्वस्त धान्य दुकाने व धान्य वितरण:-

एकुण स्वस्त धान्य दुकानांची संख्या शहरी ग्रामीण
एकुण दुकाने 208 दुकाने 112 दुकाने 96
एकुण कार्डसंख्या 155296 कार्डसंख्या 103058 कार्डसंख्या 52252
कार्ड प्रकार तालुका एकुण शहरी ग्रामीण
अंत्योदय कार्ड संख्या 13805 7411 6394
बी पी एल कार्ड संख्या 22775 9857 12918
ए पी एल कार्ड संख्या 61859 50371 11488
शुभ कार्ड संख्या 18218 11000 7218
अन्नपुर्णा कार्ड संख्या 233 183 864
प्राधान्य कुटूंब संख्या 38406 24236 14170

 

वरीलप्रमाणे प्रचंड कामकाज, लोकसंख्यावाढीमुळे तालुक्याचा दिवसेंदिवस होणारा भौगोलिक व औद्योगिक विस्तार यामुळे जळगांव तहसिल कार्यालयावर मोठ्रया प्रमाणात प्रशासकीय ताण पडत असल्याने आणि उपलब्ध अधिकारी/कर्मचारी संख्या प्रशासकीय कामकाज पार पाडतांना अपुरी पडत असून जळगांव तालुक्यासाठी अपर तहसिलदार यांचे कार्यालय स्थापन करण्याची नितांत आवश्यकता आहे.

प्रशासकीयदृष्ट्रया नियोजन व विकासाचे काम करुन घेण्यासाठी प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता तसेच गतिमानता आणणेच्या दृष्टीने तसेच विद्यमान जळगांव  तालुक्याचे तहसिल कार्यालय बळकट करण्याचे दृष्टीने अपर तहसिलदार जळगांव यांचे नविन कार्यालयास मान्यता दिल्यास त्या कार्यालयाचे कार्यकक्षेत शहरी पुरवठा विभाग आणता येईल व त्यामुळे जळगांव शहरातील सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीद्वारे वितरण होणारे धान्याचे संवितरण व नियंत्रणाकरिता स्वंतंत्रपणे धान्य वितरण अधिकारी (F D O) हे नवीन पद निर्माण करण्याची आवश्यकता राहणार नाही.