| जिल्हा भूमि अभिलेख प्रमुख | जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख |
| मुख्यालय | जळगांव |
| कार्यालयाचा पत्ता | जिल्हाधिकारी कार्यालय आवार, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगांव |
| संपर्क क्रमांक | ०२५७-२२२९८२७ |
| ई-मेल आयडी | slrjalgaon[at]yahoo[dot]in, dslrjalgaon[at]gmail[dot]com |
| अधिकार क्षेत्र | संपुर्ण जळगांव जिल्हा |
| तालुक्यांची संख्या | १५ |
| अधिनस्त कार्यालयांची संख्या | १६ |
| तालुकास्तरावरील कार्यालयांची संख्या | १६ |
| तालुकास्तरीय कार्यालयाचे पदनाम | उप अधीक्षक भूमि अभिलेख |
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख
- नोंदींचे स्कॅनिंग
जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १६ कार्यालयांच्या मूळ सर्वेक्षण नोंदींच्या १७,४४,३३८ पानांचे (स्केल मॅप्स वगळून) स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.
- सीओआरएसची स्थापना
जळगाव जिल्ह्यात चार सतत कार्यरत संदर्भ केंद्रे आहेत जी प्रामुख्याने
१. जळगाव तालुक्यातील जळगाव
२. भडगाव तालुक्यातील टोणगाव
३. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर
४. अमळनेर तालुक्यातील अमळनेर
सीओआरएस हे रोव्हर्स नेटवर्कसाठी बेस स्टेशन असेल जे प्रशासनाला मोजमाप प्रकरणांची शून्य प्रलंबितता साध्य करण्यास मदत करेल. तसेच मोजमापातील छेडछाड रद्द करून तेथे अचूक आणि अखंड मोजमाप तयार करेल.
- स्कॅनिंग व डिजीटायाजेशन
जळगांव जिल्ह्यातील 15 तालूक्यांपैकी 6 तालूक्यांचे (57552 नकाशांचे) स्कॅनिंगचे काम पुर्ण झाले असून 3 तालूक्यांचे काम प्रगतीत आहे त्यानंतर उर्वरीत 6 तालूक्याचे काम करण्यात येईल.
स्कॅनिंग झालेनंतर त्या नकाशांचे डिजीटायाजेशन चे काम सुरू असून 50099 नकाशांचे डिजीटायाजेशनचे काम पुर्ण झाले आहे.
- स्वामित्व योजना
जळगांव जिल्ह्यातील 15 तालूक्यातील गावांचे स्वामित्व योजने अंतर्गत 1206 गावठांण भूमापणाचे काम सुरू केले असून त्यापैकी 385 गावांचे काम पुर्ण झाले असून उर्वरीत काम प्रगतीत आहे.
- पाणंद रस्ते व शिव रस्ते
100 दिवस कृती आराखडा नुसार मा. जिल्हाधिकारी जळगांव व जिल्हा अधीक्षक जळगांव यांचे आदेशाने जळगांव जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून एकूण 74 गावांचे पाणंद रस्ते व शिव रस्ते आखणी करुन दिल्याने सदर रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे.
- भूमापन नकाशांचे जिओ-रेफरन्सिंग कामाबाबत
केंद्र शासन पुरस्कृत डिजीटल इंडीया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत भूमि अभिलेखांचे संगणीकीकरण करणे या योजनेंतर्गत भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन झालेनंतर भूमापन नकाशे जिओ-रेफरन्सिंग करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातुन 6 तालुक्यांची निवड करणेत आली होती. त्यामध्ये जळगांव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याचा समावेश असून या तालुक्यातील जी. सी. पी. कलेक्शन चे काम पुर्ण करणेत आलेले आहे.
तसेच दुसऱ्या टप्प्यात राज्यातून जळगांव जिल्ह्यातील भडगांव, एरंडोल, धरणगांव या 3 तालुक्यांची निवड करणेत आलेली असून त्यांचे काम सुरू आहे.
-
सर्व प्रकारचे मोजणी अर्ज भरणेकरिता
-
7/12 उतारा, 8 अ उतारा, फेरफार प्रत, ई चावडी वरील नोटीस, मालमत्ता पत्रक व इतर नकला मिळणेकरिता
-
जमिनी संबंधीत नकाशे डाऊनलोड करण्याकरिता
-
अपील प्रकरणांची माहिती मिळणेकरिता
-
लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत विविध सेवांना अर्ज करणे
-
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव जिल्हा संकेतस्थळ
अस्वीकरण: या वेबसाइटवरील माहिती संबंधित विभागांनी प्रदान केली आहे आणि ती अद्ययावत केली आहे.