- आस्थापना विभागात महसूल विभागातील वर्ग 03 पदांचे सरळ सेवा अंतर्गत जिल्हा निवड प्रक्रिया करण्यात येऊन नियुक्ती देण्यातचे कामकाज करण्यात करणे
- आस्थापना बाबींविषयक कर्मचाऱ्यांना विविध लाभ देणे.
- शासकीय कर्मचाऱ्यांचे निधनानंतर त्यांचे जागेवर अनुकंपा धारकांना सामावून घेणे.
- वर्ग 03 व वर्ग 04 संवर्गातील पदांवर पात्र कर्मचाऱ्यांना वरिष्ट पदावर पदोन्नती देणे.
- कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करणे.
- पदोन्नती देणे, सेवाविषयक बाबींचे लाभ प्रदान करणे.
- नागरी सेवा मंडळ नियत कालीक बदल्याबाबतचे कामकाज, आंतर जिल्हा / आंतर उपविभाग / आंतर विभाग बदलीबाबतचे कामकाज.
- भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे कामकाज.
आस्थापना शाखा
वर्ग-3 व वर्ग-4 च्या संवर्गातील अवल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, वाहनचालक व शिपाई फक्त जिल्हाधिकारी आस्थापना यांच्या नियत कालीक बदल्या करणे. विभागीय पदोन्नती समितीबाबतचे कामकाज अंतर्गत कोतवाल संवर्गातून वर्ग-4 संवर्गात नियुक्ती बाबतचे कामकाज, वर्ग-4 संवर्गातून महसूल सहायक व वाहनचालक संवर्गात पदोन्नतीबाबतचे कामकाज, महसूल सहायक संवर्गातून अवल कारकून संवर्गात पदोन्नतीबाबतचे कामकाज, तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नतीबाबतचे कामकाज.
अनुकंपा विषयक कामकाज अंतर्गत पात्र उमेदवारांचे प्रस्ताव, प्रतिक्षा यादी, नियुक्ती आदेश व इतर विभागांना उमेदवार पुरस्कृत करणे व अनुषंगिक ना हरकत प्रमाणपत्र निर्गमित करणे. जिल्हातील मागासवर्गीय कर्मचा-यांचे अनुशेषा बाबतचे कामकाज करणे.
आश्वासित प्रगती योजना :- वर्ग-3 व वर्ग-4 च्या संवर्गातील सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, वाहनचालक व शिपाई यांना सदर योजनेचा पात्रतेनुसार लाभ देणे.