बंद

कसे पोहोचाल?

जळगाव विमानतळ हे शहरापासून 6 कि.मी. अंतरावर आहे तसेच जळगावहून जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे. औरंगाबाद येथे उतरल्यावर, आपल्याला 160 किमी रस्त्याने प्रवास करावा लागेल ज्यास 4 तासापेक्षा कमी वेळ लागतो. जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे जळगावपासून  साधारण 410 किलोमीटर अंतरावर आहे.

जळगाव रेल्वे जंक्शन (जेएल) जे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, नवजीवन एक्सप्रेस आणि कर्नाटक एक्सप्रेस इत्यादीद्वारे नवी दिल्ली, बंगलोर, म्हैसूर, लखनऊ, चेन्नई, कन्याकुमारी, पुरी, अहमदाबाद, जयपूर आणि पटना या शहरांशी जोडलेले आहे.

खाजगी आणि सार्वजनिक बस जळगाव पर्यंत व पासून प्रवास करण्यासाठी भरपूर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (म.रा.मा.प.म.), राज्य बस सेवा, जळगाव पासून महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये कार्यरत आहे. एमएसआरटीसी कडे जळगाव आणि इंदोर, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सूरत आणि अनेक इतर शहरांशी जोडलेले आहे.