मनुदेवी मंदिर
महाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कॄतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडिचा जिल्हा म्हणजे जळगांव जिल्हा होय. जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सुर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर. यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या चिंचोली किंनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आंडगाव फाटा आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र अवघे 9 किलोमीटर वर आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्राकडे जातांना 6 किलोमीटर वर श्री हनुमानाचे मंदिर आहे. श्री हनुमान मंदिरापर्यंतची सडक हि पक्की डांबराची आहे. श्री हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे.
श्री हनुमान मंदिरापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र हे जवळपास ३ किलोमीटर वर आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा 3 किलोमीटरचा कच्चा रस्ता संस्थेने बांधून घेतला आहे. त्यामुळे आता खाजगी वाहने (टू व्हिलर,ऑटोरीक्षा, कार, जीप, टॅक्सी इ.) थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. जळगांव ते श्री मनुदेवी मंदिर हे 35 कि. मी. आहे.
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ जळगाव आणि औरंगाबाद
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक जळगाव
रस्त्याने
जळगाव येथून बस उपलब्ध आहे